लोणी काळभोर, (पुणे) : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय सोयीसाठी बदल्या करण्यात आल्या असून एका ठिकाणी दोन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या २ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. तर पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या ११ पोलीस निरीक्षकांची नियमित पदस्थापना केली आहे. तसेच ८ पोलीस निरक्षकांची मुदतपूर्व या बदल्या करण्यात आल्या आहेत. असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी काढले आहेत.
(बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे बदली झाली)
संजय शंकर जगताप (कामशेत पोलीस ठाणे ते शिरुर पोलीस ठाणे), आण्णासाहेब बाळासाहेब घोलप (सासवड पोलीस ठाणे ते राजगड पोलीस ठाणे), उमेश तावसकर (जेजूरी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), महेश कृष्णराव ढवण (पोलीस कल्याण शाखा ते रांजणगाव पोलीस ठाणे)
बळवंत कुंडलिक मांडगे (रांजणगाव पोलीस ठाणे ते मंचर पोलीस ठाणे), सचिन दिनकर पाटील (राजगड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष)
विलास शामराव भोसले (वडगाव मावळ पोलीस ठाणे ते सुरक्षा शाखा), सतिश भाऊसाहेब होडगर (मंचर पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), संतोष शामराव जाधव (सुरक्षा शाखा ते सासवड पोलीस ठाणे, बापूसाहेब पोपट सांडभोर (जिल्हा वाहतूक शाखा ते जेजूरी पोलीस ठाणे), बबन शंकर पठारे (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष), आण्णा मन्याबा पवार (नव्याने हजर – आर्थिक गुन्हे शाखा), ललित भगवान वर्टीकर (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष), रविंद्र दत्तात्रय पाटील (नव्याने हजर – कामशेत पोलीस ठाणे), कुमार रामचंद्र कदम (नव्याने हजर – वडगाव मावळ पोलीस ठाणे)
दिनेश सखाराम तायडे (नव्याने हजर – बारामती शहर पोलीस ठाणे), सुभाष सदाशिव चव्हाण (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष), राजेश गणेश गवळी (नव्याने हजर – पोलीस कल्याण शाखा), सूर्यकांत देवराव कोकणे (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष), सुहास लक्ष्मण जगताप (नव्याने हजर -जिल्हा वाहतूक शाखा), शंकर मनोहर पाटील (नव्याने हजर – भोर पोलीस ठाणे)