दिपक खिलारे
इंदापूर : समता सैनिक दल, या राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटनेच्या वतीने सर्व समता सैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी शहरात संविधान उद्देशीकीचे वाचन व वाटप करुन अनोखा उपक्रम राबवित संविधान दिन साजरा करण्यात आला.
समता सैनिक दलाच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन केले. त्याचबरोबर शहरातील खडकपुरा चौकातील संविधान स्तंभाला फुलांच्या माळांने सजविण्यात आले होते. यावेळी उद्देशीकेच्या वाचनासह जयघोष करण्यात आला.
तसेच इंदापूर तालुका तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस ठाणे, इंदापूर पंचायत समिती आणि इंदापूर नगरपालिका या शासकीय कार्यालयामध्येही समता सैनिक दलाकडून भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करून त्या-त्या विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थित संविधानाची उद्देशीकीचा फोटो कार्यालयामध्ये समोर दर्शनीभागावर लावण्यासाठी १८ × २० आकाराचे फ्रेमसह तैल्यचित्र (फोटो ) समता सैनिक दलाच्या भेट देण्यात आले.
यावेळी सर्व विभागातील प्रमुखांसमवेत समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक पोळ यांच्या सह इंदापूर तालुका अध्यक्ष तानाजी मोरे, उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार अॅड. जे. एन. पोळ, तालुका कार्यध्यक्ष मा. शामराव जाधव, तालूका संपर्क प्रमुख सुर्यकांत चव्हाण, जेष्ठ मार्गदर्शक जयसिंग जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार खंडाळे, संकेत चितारे, शक्तिकुमार खरात, दादा औताडे, लव्हु पोळ, वनेश कांबळे, भजनदास गायकवाड, सुरेश शिरसट यांह संघटनेचे तमाम कार्यकर्ते व समता सैनिक उपस्थित होते.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन विनय मखरे यांनी केले तर सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संतोष जामदार यांनी केले.