लोणी काळभोर : आळंदी म्हातोबा (ता. हवेली ) येथील राजेंद्र विठ्ठल जवळकर (वय- ४५) यांचे बुधवारी (ता. १४) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
राजेंद्र जवळकर हे मागील अनेक वर्षांपासून सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीत कामाला होते. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, असा मोठा परिवार आहे.
आळंदी म्हातोबाची येथील तलाठी कार्यालयातील कर्मचारी संजय विठ्ठल जवळकर व सामाजिक कार्यकर्ते विजय विठ्ठल जवळकर यांचे ते मोठे बंधू होत.