बापु मुळीक
सासवड : जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दुपारी (तां. 22) एक वाजता शिवतीर्थ ते नवीन प्रशासकीय इमारत असे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, करण्यात आली. त्यानंतर शिवतीर्थ येथून प्रशासकीय इमारत येथे मोर्चा आल्यानंतर, प्रशासकीय इमारत आवारात दौलत नाना शितोळे मनाले की, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या, माध्यमातून पुरंदर तालुक्यात होणाऱ्या संभाव्य आंतरराष्ट्रीय विमानतळास आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचे नाव देण्याबाबत सभागृहात मागणी केली. या मागणीला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात होणाऱ्या संभाव्य आंतरराष्ट्रीय विमानतळास पुरंदरचे नाव जगात पुढे, आणलेल्या आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मोर्चा काढून करण्यात आली.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयावर जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाच्या वतीने, भेट घेऊन, आंतरराष्ट्रीय विमानतळास आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचे नाव देण्यात यावे ,अशी आग्रही मागणी केली जाईल. असे शितोळे यांनी सांगितले. नंतर पुरंदरच्या तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे, गणपत शितकल, गंगाराम जाधव, राज्य, जिल्हा, शहर व तालुक्याची सर्व मान्यवर , पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विष्णू भोसले, मनोहर नाना ताथवडकर, कैलास धिवार, चर्मकार संघ, नाभिक संघटना यांनी संभाव्य आंतरराष्ट्रीय विमानतळास आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचे नाव देण्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला.