पुणे: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवल्याबद्दल आणि त्रासदायक कॉल केल्याबद्दल महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अमोल काळे नावाच्या २५ वर्षीय तरुणाला अटक केली. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपी मुंडे यांना काही दिवांपासून कॉल आणि मेसेज द्वारे त्रास देत होता. सायबर पोलिसांनी काळेचा मोबाईलनंबर ट्रेस करू
सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी येथील पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने काळेला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने मुंडे यांना कॉल केल्याचे आणि संदेश पाठवल्याचे कबूल केले. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ७८ आणि ७९ आणि तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला.
काळेच्या कृत्यामागील हेतू शोधण्यासाठी तपास सुरू आहे. काळे हा विद्यार्थी असून बीड जिल्ह्यातील परळी येथील असल्याचे वृत्त आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.