मुंबई: मी 96 कुळी मराठा आहे, कुठलाही मराठा कुणबी दाखला घेणार नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळे घटक आहेत. मी आयुष्यात कधीही कुणबी दाखला घेणार नाही असंही ते म्हणाले.
तसेच हमासचे कौतुक करणाऱ्या शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगले काम केलेलं दिसत नाही का असा थेट प्रश्न नारायण राणे यांनी विचारला आहे. सध्या शरद पवार हे काही लोकांना वाचवण्यासाठी ना देशाच्या ना समाजाच्या हिताचे बोलतात अशी टीकाही राणे यांनी केली. शरद पवार यांना मोदी विरोधाची कावीळ झाली असल्याने त्यांनी केलेली चांगली काम त्यांना दिसत नाहीत असे नारायण राणे म्हणाले.
मराठा आरक्षणावर काय म्हणाले राणे?
मराठा आणि कुणबी याच्यात फरक आहे. मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करायला हवा. समाजातील जातीला किंवा एखाद्या वर्गाला आरक्षण देताना घटनेचा अभ्यास करावा लागतो. मी स्वतः भरपूर अभ्यास केला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की, घटना काय सांगते. मी स्वतः मराठा आहे, मला कुणबी प्रमाणपत्र नको. कुठलाही मराठा हा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही.
हेही वाचा:
Hardik Pandya: भारताला मोठा झटका, हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर; स्कॅनसाठी रुग्णालयात
Sharad Pawar: माढ्यामधून निवडणूक लढवणार की नाही? शरद पवारांनी सांगितला त्यांचा निर्णय