Month of Dhonda शिरूर : खरे पहाता जावई हा जिव्हाळ्याचा, आधाराचा धागा पुर्वीपासून जपण्यात आला आहे. प्रत्येक नाते शब्दातून सांगण्यापेक्षा प्रतिकातून, उत्सवांच्या माध्यमातून विषद करण्याची पद्धत हिंदू संस्कृतीत आहे. काळ बदलला तशी सण उत्सवांची पद्धत बदलत गेली. वाण देण्याच्या वस्तू ही बदलल्या. मात्र नात्यांमधील परंपराची साखळी अतूट असल्याची पहावयास मिळत असून धोंड्याच्या महिन्यात लेकी माहेराला येणार, या मुळे नात्यातील प्रेम वाढल्याचे दिसून येऊ लागले आहे. (Month of Dhonda)
हिंदू संस्कृतीत परंपरेत प्रत्येक नात्याला मान
प्रामुख्याने हिंदू संस्कृतीत परंपरेत प्रत्येक नात्याला मानाने वागवले जाते. जणेकरून परस्पर ऋणानुबंध दृढ होतात. आधिक मासानिमित्त असेच एक हळूवार नाते, ते म्हणजे सासु – सासरे आणि जावयाचे पहावयास मिळते. (Month of Dhonda)
आपल्या मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाणे संभाळून घेणारा जावई. हा मुलीच्या मातापित्यांना नात्यातील सुखद अनुभव देणारा असतो. यामुळेच पुरूषोत्तम मासात जावायाचा मान म्हणून स्वखुशीने वस्तू दिल्या जातात. दर तीन वर्षानी धोड्यांचा महिना येतो. त्यामुळे या वर्षी १८ जुलै पासून अधिक मासाला सुरूवात झाली.
मुलीच्या आई वडीलांची जावायाला घरी जेवायला बोलवण्याची तयारी सुरू असून धोड्यांचा महिना, अधिक मास म्हणून पाळला जातो. नवविवाहित मुली या महिन्यात आपल्या भावाची वाट पहात माहेरी जाण्यासाठी लगबग करत असतात. या वर्षी १८ जुलै ते १६ ऑगस्ट पर्यंतचा काळ हा अधिक मासाचा काळ आहे.
दरम्यान, मुलगी व जावई हे या काळात लक्ष्मी नारायण म्हणून पुजले जातात. त्या बरोबर जावयास धोंडा म्हणजे सोन्याचा दागिना ऐपती प्रमाणे दिला जातो. चांदिचे दिवे, तबक, किंवा भेटवस्तू भांडी स्वरूपात दिल्या जातात. नवीन कपडे दिले जातात. सोन्याचा धोंडा किंवा अन्य स्वरूपात दान करण्याची प्रथा आहे. त्यामुळे असे म्हणतात की ‘आला अधिक मास जावायाला मिळणार सोन्याचा घास’
परंपरा आणि संस्कृती ह्या नात्याला घट्ट करतात. त्यामुळेच निसर्गाच्या बदलाच्या काळात वेगवेगळ्या सण व उत्सवांना सुरूवात होते. अधिक मासात जावई व मुलींचा सन्मान हा देखील त्यातील एक भाग आहे. संस्कृतीचे जतन करत असताना नात्यातले ऋणानुंबध वाढण्यास मदत होते.
अरूणा घोडे (माजी पंचायत समिती सदस्या – शिरूर)