बापू मुळीक
जेजुरी(सासवड ) : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया बहुजन बांधवांचा सर्वसामान्यांचा लोक देव म्हणून ओळखला जातो. परंतु, सध्या खंडेरायाचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळ सर्वसामान्यासाठी नव्हे तर व्हीआयपी भक्तांची सरबराई करण्यासाठी आणि चमकोगिरी करण्यासाठीच कार्यरत असल्याचा भाविकांकडून आरोप करण्यात येत आहेत. लावणी नृत्यंगनेने नुकतेच जेजुरीच्या खंडेरायाचे देवदर्शन घेतले. मात्र रविवारच्या दिवशी गडावर जाणाऱ्या वाहनासाठी आपत्कालीन घाट रस्ता बंद ठेवल्याचा नियम विश्वस्त मंडळांनी केला असल्याने, संबंधित नृत्यगनेस वाहन घाट रस्त्यावरून सोडता येईना. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी गडकोटाच्या बाहेर सज्ज ठेवण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा वापर त्यांना गडावर नेण्या आणण्यासाठी करण्यात आला.
दरम्यान काही जागरूक भाविकांनी या रुग्णवाहिकेसह संबंधित नृत्यांगणेचा फोटो काढून, ते प्रसार माध्यमावर टाकले. आणि नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती. खंडेरायाचे मंदिर व्यवस्थापन करणारे विश्वस्त सर्व नियम पाळून कारभार करीत आहेत. रविवारी संबंधित नृत्यांगना येणार असल्याचे फोन आला होता. मात्र रविवारी कोणतीही खासगी गाडी आपत्कालीन घाट मार्गाने वर सोडता येत नाही, असे सांगितले होते. त्यामुळे त्या चालत निघाल्या होत्या. त्या वेळीच रुग्णवाहिका कामानिमित्त गडावर निघाली होती. त्यावेळी प्रतिष्ठित महिला चालत जाण्यापेक्षा त्यांना रुग्णवाहिकेतून, नेण्यात आली . यात कोठेही नियमाचे उल्लंघन झालेले नाही. असं स्पष्टीकरण जेजुरी देवसंस्थांनचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते,( पाटील) यांनी दिले आहे.