पुणे : डिजिटल करन्सी-& nbsp;’ डिजिटल रुपया’ (Digital Rupees) & nbsp; चा देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट आज (एक नोव्हेंबरपासून) सुरू होत आहे. त्यामध्ये ९ बँक सरकारी सिक्योरिटीज मध्ये आर्थिक व्यवहारासाठी या डिजिटल करन्सी & nbsp;(Digital Currency) & nbsp; चा वापर करणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने सोमवारी याबाबत निवेदन जाहीर केले आहे. ”डिजिटल रुपयाचा पहिला पायलट परीक्षण एक नोव्हेंबरपासून सुरू होईल. या टेस्टिंग अंतर्गत सरकारी सिक्योरिटीज मध्ये सेकेंडरी मार्केट व्यवहार केला जाईल, असे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
आरबीआयने ‘केंद्रीय बँक डिजिटल मुद्रा’ (central bank digital currency OR CBDC) आणण्याच्या दिशेने पाऊल टाकत डिजिटल रुपयाची पायलट टेस्टिंग सुरू केली आहे. होलसेल खंड (Wholesale Transactions) साठी होणाऱ्या या परीक्षणात ९ बँक सामील होतील.
या बँकांमध्ये भारतीय स्टेटबँक (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी आदि सामील आहे.
त्याचबरोबरआरबीआयने म्हटले की,डिजिटल रुपयेचा पहिला पायलट परीक्षण एक महिन्याच्या आत सुरू करण्याची योजना आहे. हे परीक्षण विशेष वापरकर्ता समुहांमध्ये निवडक स्थानांवर केले जाईल. त्यामध्ये ग्राहकआणि व्यापारी सामील आहेत.रिझर्व्ह बँकनुसार भविष्यात पालयट परीक्षणामध्ये होलसेल स्तरावर होणाऱ्या अन्य व्यवहार व पेमेंटवरही लक्ष दिले जाईल.