Pune News : इंदापूर, (पुणे) : अतिक्रमण काढल्याच्या कारणावरून सरपंचासह एकावर १३ जणांनी तलवार व लोखंडी रॉडने वार केल्याची धक्कादायक घटना अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे घडली आहे. याप्रकरणी उपसरपंचासह १३ जणांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील घटना..
सरपंच प्रवीण साबळे व भीमराव खरात असे तलवार व लोखंडी रॉडने मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी उपसरपंच गणेश मारुती शिंदे, अनिकेत ज्ञानेश्वर धुमाळ, अल्ताफ अहमद शेख, सूरज दादा चव्हाण, हेमंत ज्ञानेश्वर दगडे, अस्लम पठाण, (Pune News) सुमीत सुनील शिंदे (रा. सर्व अंथुर्णे), अक्षय गुळीक, दीपक पाडुरंग भोसले (रा. दोघे, शेळगाव) व अनोळखी चौघे अशा १३ जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामामध्ये अडथळा व अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ शेख व सूरज चव्हाण या दोघांनी शुक्रवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अतिक्रमण काढल्याच्या कारणावरून सरपंच साबळे व खरात यांना शिवीगाळ केली. साबळे व खरात पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी निघाले (Pune News) असताना वरील १३ जणांनी मोटार अडवून मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात रंगला भोंडला महोत्सव
Pune News : ऐन सणासुदीच्या दिवसांत पुणे रेल्वे स्थानक ‘फुल्ल’