पुणे : पुणे – मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेवर बसण्यावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवार ( ता. १२) रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
तर, पिंपरी चिंचवड या स्थानकावर सिंहगड एक्सप्रेस थांबते. या स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड साठी ट्रेनला स्वतंत्र बोगी देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी, चिंचवडला स्वतंत्र बोगी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच या मागणीसंदर्भात रेल्वे प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र वारंवार सांगूनही रेल्वे प्रशासन योग्य निर्णय घेत नसल्याने आम्हाला शेवटी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा देखील पिंपरी-चिंचवड रेल्वे संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी दिला आहे.