पुणे : आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. तुमचा आजचा दिवस कसा असेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
सहलीचे नियोजन कराल मानसिक दुर्बलता पळून जाईल.
वृषभ
इतरांकडून अपेक्षा वाढतील चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे ओढा राहील.
मिथुन
स्त्रियांकडून अडलेली कामे करून घेतल्यास ती लवकर होतील.
कर्क
कलाकारांना त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे आर्थिक लाभ कमी कष्टात होतील.
सिंह
विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष जरा कमी द्यावे अहंकार कमी करायला हवा.
कन्या
तुमच्या स्वभावातील राग आणि अविचारीपणा यावर ताबा ठेवायला हवा.
तूळ रास
बोलल्यामुळे इतरांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक
प्रकृतीच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल पथ्य पाणी सांभाळावे.
धनु
घरातील मोठ्या माणसांशी मतभेद संभवतात तुमच्या आचार विचारात स्वतंत्र विचारांना थारा द्याल.
मकर
अनपेक्षित पण एखादा खर्च उद्भवून पैसे खर्च होतील.
कुंभ
तुमच्या बुद्धीला व्यवहाराची जोड मिळून योग्य तो निर्णय घ्याल.
मीन
महिला बोलण्यात मागे हटणार नाहीत उत्साही आणि आनंदी दिवस राहील.