पुणे : पंचांगानुसार आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या बारा राशींचे आजचे राशी भविष्य जाणून घेऊया..
मेष
आतापर्यंत ज्या कामात अडचणी येत होत्या त्या आजच्या दिवशी जास्त कष्ट न घेता कामे पूर्णत्वाला जातील.
वृषभ
दूरदर्शीपणाने केलेल्या कामांचा फायदा पुढे मिळणार आहे.
मिथुन
कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात अनेक संधी निर्माण होतील.
कर्क
नोकरी धंद्याच्या ठिकाणी आपले तेच खरे करण्यामुळे तोटे होण्याची शक्यता आहे.
सिंह
एखाद्याचा विरोध सहन करावा लागेल घरामध्ये इतरांची मते न पटल्यामुळे मानसिक तानाला सामोरे जावे लागेल.
कन्या
तुमच्या स्वभावातील विशिष्ट वागणुकीमुळे लोकांपर्यंत पोचणार आहात.राजकारणामध्ये मनासारख्या घटना घडतील
तूळ
तुमच्यामुळे समोरच्या माणसाची मने दुखावली जाणार नाही त्याची काळजी आज घ्या
वृश्चिक
आजच्या दिवशी महिलांची थोडी कुचंबणा होईल आणि थोडा तापटपणाही वाढेल.
धनु
आज कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसाल महिलांनी घरातील शांतता टिकवण्याचा प्रयत्न करावा.
मकर
नोकरी धंद्यामध्ये सतत काहीतरी उलाढाल कराल स्वतःच्या मनासारख्या गोष्टी केल्याशिवाय चैन पडणार नाही.
कुंभ
समोरच्याला आपली मते पटवून देण्यात तरबेज राहाल.
मीन
नोकरीत वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता रक्तदाब हृदयविकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.