पुणे : राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यामध्ये मात्र उष्ण व दमट हवामान असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात उन्हाचा चटका कायम असताना मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज विदर्भात वादळी पावसासह गारपीटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर राज्यातीलं ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यामध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जेऊर, सातारा,सोलापूर,धाराशिव ब्रह्मपुरी,चंद्रपूर आणि यवतमाळ येथे 39° पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे शहरामध्ये उष्णता वाढल्याचं जाणवणार आहे. पुण्यातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 36.5 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. पुण्यामध्ये संध्याकाळनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.