पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पत्नी लता यांच्याहस्ते आज रविवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे.
या शासकीय पूजेत गेवराई (ता. रुई,जि.बीड ) येथील मुरली भगवान नवले (वय-५२) व जिजाबाई मुरली नवले (वय-४७) या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला आहे.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू रुद्रांश अशा चार पिढ्या उपस्थित होत्या. ज्यांच्या चार पिढ्यांकडून एकत्र पूजा व वारी झाली असे एकनाथ शिंदे हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.