पुणे : मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. हा अधिकार मिळविण्यासाठी नागरिकांना मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी वयोमर्यादा १८ वर्षे आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्ही मतदार कार्डसाठी अर्ज करून ते मिळवू शकता. मतदार कार्ड हे केवळ मतदान करण्यासाठी आवश्यक नसून ते नागरिकांचे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. हे ओळखपत्र सरकारी-निमसरकारी नोकरी, मालमत्ता खरेदी-विक्री, बँक खाते उघडणे इत्यादींसाठी आवश्यक ठरते.
नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला फॉर्म 6 निवडावा लागेल. फॉर्म शोधण्यासाठी, तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल निवडावे लागेल. ‘राष्ट्रीय सेवा’ विभागांतर्गत, नवीन मतदार ओळखपत्रासाठी ‘ऑनलाइन अर्ज करा’ वर क्लिक करा. त्यानंतर ते तुम्हाला ऑनलाइन अर्जावर घेऊन जाईल.
असे करा कार्ड तयार :
ECI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर क्लिक करा.
‘Apply Online for registration of New Voter’ वर क्लिक करा.
माहिती प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
‘सबमिट’ वर क्लिक करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर, तुमच्या ईमेल आयडीवर एक ईमेल मिळेल. या ईमेलमध्ये पर्सनल व्होटर आयडी पेजची लिंक असेल, याला भेट देऊन तुम्ही तुमच्या अर्जाचा मागोवा घेऊ शकाल, एका महिन्याच्या आत तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र मिळेल.
मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :
तुमचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो
ओळखीचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा हायस्कूल मार्कशीट.
पत्ता पुरावा म्हणून रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोन किंवा वीज बिल दिले जाऊ शकते.