सुरेश घाडगे
परंडा : चांगला साखर उतारा देणारा ऊस शेतकऱ्यांनी लावावा व चांगले उत्पादन घेवून उच्च दर ऊसाला घ्यावा . गत गळीत हंगामात आयान मल्टीट्रेड एल.एल.पी. संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याने २४५१ रुपये चांगला दर दिला आहे .आगामी काळात यापेक्षाही चांगला भाव ऊसाला देऊ . आगामी काळात या कारखान्यावर कृषी प्रदर्शन घेऊ तसेच शेतकरी विकास योजना राबवू .असे आश्वासन विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
परंडा -भूम तालुक्याच्या सरहद्दीवरील आयान- बाणगंगा सहकारी साखर कारखाना ईडा -जवळा येथील ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आज शनिवार ( दि. १ ) आजोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी वरील आश्वासन दिली. यावेळी माजी आमदार तथा चेअरमन राहूल मोटे यांच्यासह संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस चे विविध पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते .
पुढे बोलताना पवार म्हणाले की,आयान मल्टीट्रेड एल.एल.पी. संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याकडे गाळप हंगाम २०२१-२२ करिता गाळपास आलेल्या ऊसाला गत गळीत हंगामात या कारखान्याचा २४५१ परंडा विधानसभा मतदार संघातील उच्चांकी दर ठरला आहे .आयान-बाणगंगा या साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२१-२०२२ मध्ये ५४५३०३.४९५ मे टन ऊसाचे गाळप केले आहे . वजन
काटा ही योग्यच आहे .कोठेही वजन करा व घेऊन या किलोचाही फिरक असणार नाही ,असेही पवार म्हणाले .
दरम्यान, ८६०३२ , ८००५ , १०००१ अशा जास्त साखर उतारा सुधारीत ऊसाच्या जातीची निवड पिकासाठी निवड करुन चांगल्या प्रतिचा ऊस शेतकऱ्यांनी गाळपास द्यावा . कारखाना व शेतकरी यांचा विकास झाला पाहिजे . आगामी काळात या कारखान्यावर कृषी प्रदर्शन घेऊ तसेच शेतकरी विकास योजना राबवू . असे यावेळी पवार म्हणाले.