राहुलकुमार अवचट
Daund News : यवत : यवत (ता. दौंड) येथील अनिता उदय मोरे यांची सहाय्यक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. नागपूर शहर सहाय्यक पोलिस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सोमवारी (ता. २२) याबाबतचा शासन आदेश काढला आहे. (Anita More of Daund taluka has been promoted to Assistant Commissioner of Police)
अनिता मोरे यांचे वरवंड (ता. दौंड) हे माहेर तर यवत हे सासर आहे. सर्वसामान्य कुटुंबातील अनिता मोरे यांनी पोलिस दलातील विविध पदांवर कामकाज केलेले असून लोणावळा, भोसरी व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले आहे. (Daund News) याबरोबरच पुणे सी.आय.डी. मध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
पुणे क्राईम युनिट ३ मध्ये होत्या त्या कार्यरत
दरम्यान, पुणे पोलिस दलाच्या क्राईम युनिट ३ मध्ये त्या सध्या त्या कार्यरत होत्या. (Daund News) दौंड तालुक्यातील अनिता उदय मोरे या यवत येथील पुणे जिल्हा बँकेतील अधिकारी किरण मोरे यांच्या भावजय असून भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुरेश शेळके यांचे भाचे उदय मोरे यांच्या पत्नी आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : संकटावर मात करीत वीरपत्नीने मिळवली पोलिस दलात नोकरी
Daund News : दौंड येथे दहावीच्या मुलीची भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या ; परिसरात हळहळ..