छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडुन मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगर येथे’ टु बीम’ सारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी हे नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीमसारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90% रुग्णावर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात येणार आहेत.राज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदाच ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहे. या सुविधेमुळे आता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरापासून तीन ते चार किलोमीटर परिसरात गुणात्मक आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.