उरुळी कांचन, (पुणे) : एका खाजगी कंपनीत काम करणारे उरुळी कंचन (ता. हवेली) येथील संजय साळवी यांचे मागील महिन्यात अपघातात निधन झाले होते. या कोसळलेल्या संकटामुळे मयत साळवी यांचा संसारच उघड्यावर पडला होता. त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी उरुळी कांचन येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मदतीचा हात पुढे करुन दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व त्याच अपघातात अपंगत्व आलेल्या त्यांच्या पत्नीचे वैद्यकीय जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे परिसरामध्ये मोठ्या प्रमणात कौतुक होत आहे.
सेवा त्याग समर्पण या भाजपच्या ब्रीद वाक्यानुसार व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंत्योदय डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वाटचाल केलेली आहे. संजय साळवी हे एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. मागील महिन्यात उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात संजय साळवी व त्यांच्या पत्नी रास्ता ओलांडत असताना त्यांचा अपघात झाला.
या अपघातात संजय साळवी यांचे निधन झाले तर त्यांच्या पत्नीला अपंगत्व आले. त्यांच्या पश्चात कुटुंबात आई, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पत्नीपुढे दोन मुलांसह जगावे कस असा पेचप्रसंग उभा राहीला तर आईने म्हातार पणातील आधार गमावल्याने तिच्या पुढेही संकट निर्माण झाले होते. त्यातून त्यांना सावरण्यासाठी येणार्या अडचणी
दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उरुळी कांचनचे सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, संजय साळवी यांची दोन मुले आहेत. त्यातील एक मुलगा अथर्व हा १० वीच्या वर्गात शिकत आहे तर दुसरा मुलगा सुशांत हा ११ वीत शिकत आहे. या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, संजय यांची पत्नीची वैद्यकीय जबाबदारी या कुटुंबाला सर्व शासकीय मदत ही
मिळून देण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन यांनी उचलली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. ३१) सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एकत्र येऊन सुशांत याला शिक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी भाजपाचे विकास जगताप, श्रीकांत कांचन, अजिंक्य कांचन, सारिका लोणारी, शाम गावडे, सुदर्शन चौधरी, अमित कांचन, शरद खेडेकर, शुभम वलटे, ऋषिकेश शेळके, सचिन शेलार, अभिजीत महाडिक, जयेश जाधव, नामदेव महाडिक, कुणाल वनारसे, शेखर टिळेकर, रोहन टिळेकर, स्वप्निल मोरे आदी उपस्थित होते