पुणे : बँक ऑफ बडोदामध्ये तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या 518 जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च होती मात्र ती आता वाढवण्यात आली आहे.
स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 ते 43 वर्ष असणे गरजेचे आहे. प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा वेगळी आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल तसेच पदानुसार शैक्षणिक पात्रता देखील वेगळी असणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च होती मात्र आता अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली. त्यानुसार आता इच्छुक व पात्र उमेदवार 21 मार्च 2025 पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात.उमेदवार bankofbaroda. in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
या पदासाठी सामान्य,ओबीसी आणि ईडब्ल्यू प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 600 रुपये आणि एससी,एसटी,दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 100 रुपये भरावे लागणार आहेत.