नांदेड : लोकसभा निवडणूक झाली आता नुकतीच विधान परिषद निवडणूक सुद्धा पार पडली आहे. आता राज्यात धामधूम बघयला मिळत आहे ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांची. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात आता अशोक चव्हाण यांचे वर्गमित्र, माजी मंत्री डी. पी. सावंत महिन्याभरात राजकीय निर्णय घेणार आहेत. काँग्रेस सोडून डी. पी. सावंत लवकरच अशोक चव्हाण यांची साथ देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाण राज्यसभेचे सदस्य झाले. आता नांदेडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे समोर येत आहे. अशोक चव्हाण यांचे वर्गमित्र, माजी मंत्री डी. पी. सावंत महिन्याभरात राजकीय निर्णय घेणार आहेत. काँग्रेस सोडून डी. पी. सावंत लवकरच अशोक चव्हाण यांची साथ देणार असल्याच्या चर्चा होत आहे. डी. पी. सावंत हे याआधी राज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आता डी. पी. सावंत काय निर्णय घेणार? यांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
डी. पी. सावंत काँग्रेसची साथ सोडणार?
अशोक चव्हाण यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये अनेकांनी नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडल्याचे चित्र दिसून आले. मात्र त्यांचे वर्गमित्र आणि निकटवर्ती समजले जाणारे काँग्रेसचे माजी मंत्री डी. पी सावंत हे देखील लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. ते तब्येतीच्या कारणामुळे तीन महिने राजकीय जीवनापासून दूर राहिले होते. आता महिनाभरात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजकीय निर्णय घेणार आहेत. काँग्रेस सोडून ते अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भाजपात जाणार की, काँग्रेसमध्ये राहून नांदेड उत्तर विधानसभा लढवणार? याकडे सगळे लक्ष ठेवून आहे.
डी. पी. सावंत काय म्हणाले?
डी. पी सावंत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. माझ्या तब्येतीमुळे मागची तीन महिने मी कुठे गेलो नाही. मी अजून तरी काँग्रेस सोडलेली नाही. अशोकराव चव्हाणसाहेब माझे मित्र आहेत. कॉलेज पासून मित्र आहेत, मैत्रीत राहणारच आहे. माझा नांदेड उत्तर मतदारसंघ होता. तिथे युतीचे आमदार आहेत. त्यामुळे युतीत आता तिकीट बदलण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे काय करावं याबाबत मी अजून विचार केलेला नाही. एका महिन्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे, असं डी. पी सावंत यांनी म्हटलं आहे.