पोपट पांचगे
शिरूर : पिंपरी दुमाला, ता.शिरुर येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अभिषेक शेळके यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.
या आधीचे अध्यक्ष सुनिल अनंथा सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदाच्या रिक्त जागेसंदर्भात चर्चा झाली.यावेळी अध्यक्षपदी शेळके यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामध्ये सोनवणे यांच्यासह शेखर पाटेकर, कैलास पिंगळे, अरुण कळसकर, कैलास बडदे आणि डॉ.श्रीकांत सोनवणे हे कार्यरत असून,सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यापूर्वी अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गे लावण्यात हे विश्वस्त मंडळ यशस्वी ठरले आहे.
दरम्यान,सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर व परिसरातील महत्त्वाची विकासकामे मार्गी लावण्यावर भर देणार असल्याचे नूतन अध्यक्ष शेळके यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.