सुरेश घाडगे, परंडा
Aashadhi Vari : परंडा : शहरात बुधवारी आगमन झालेली शांतीब्रम्ह श्रीसंत एकनाथ महाराज यांची पालखी गुरुवार (दि.२२) सकाळी ११ वाजता हरी नामाचा गजर करत पंढरपुरच्या दिशेने मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. शहरात पैठण येथून आलेली श्रीसंत एकनाथ महाराज यांची ४२५ वर्षांची परंपरा असलेली पालखी बुधवारी (दि.२१) सायंकाळी दाखल झाली. यावेळी शहरातील मान्यवरांनी स्वागत केले तर भाविक भक्तानी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. (Aashadhi Vari)
पालखी मोहन देशमुख यांच्या निवासस्थानी मुक्कामी विसावली. यावेळी देशमुख परिवाराच्या वतीने आभिषेक करण्यात आला. भजन, कीर्तन, हरीपाठ व महाप्रसाद वाटप कार्यक्रम झाला. (Aashadhi Vari)
श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांसाठी मंगळवारी सकाळी नाष्टा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने आरोग्य सेवा देण्यात आली. (Aashadhi Vari)
यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, रणजित पाटील, विश्वजित पाटील, वैद्यकीय अधिक्षक व्ही. डी. कुलकर्णी, मोहन देशमुख, मुकुंद देशमुख, अजित पाटील, बुध्दीवान लटके, प्रशांत गायकवाड, किशोर पाटील आदीसह भाविक भक्त उपस्थित होते. (Aashadhi Vari)