Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चुकून कीटकनाशक प्यायलेल्या तीन वर्षांच्या अरविंदने केली मृत्यूवर मात ; 23 दिवसांच्या उपचारानंतर झाला ठीक

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 22 June 2023, 20:02

Pune News पुणे : मुळशीतील शेतमजुराच्या तीन वर्षाच्या चिमुकल्याने शेतात खेळत असताना चुकून कीटकनाशक प्यायले होते. त्यानंतर या बालकावर ससून रुग्णालयातील बालराेग विभागात उपचार सुरू होते. (Pune News) अखेर डॉक्टरांनी 23 दिवस केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या बालकाचे प्राण वाचले. (Pune News)

अरविंद जाधव असे त्या चिमुकल्याचे नाव असून, ताे मुळशी तालुक्यातील भादस या गावातील रहिवाशी आहे. त्याचे वडील राणू आणि आई सीता जाधव हे शेतमजूर आहेत. शेतात काम करताना त्यांचा लहान मुलगा बाजूला खेळत होता. शेतात कीटकनाशकाची पडलेली बाटली त्याने खेळता खेळता तोंडाला लावली. उशिराने ही बाब तेथे असलेल्या राहुल जोरी यांच्या लक्षात आली. पण तेव्हा त्याच्या तोंडातून फेस आला व वाफाही येत होत्या.

या घटनेनंतर चिमुकल्याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, ताे अत्यवस्थ असल्याने त्याला मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. बंडू जोरी, माधव जोरी आणि संजय गावडे यांनी धावपळ करत त्याला ससूनला हलवले. ससूनमध्ये बालकावर तातडीने उपचार सुरू केले.

 

ससूनच्या बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालराेग विभागातील डाॅ. शलाका पाटील, डॉ. गोकुळ पावसकर, डाॅ. नरेश सोनकवडे व इतर डाॅक्टरांनी ससून रुग्णालयात मुलांच्या अतिदक्षता विभागात उपचार केले.

कीटकनाशक ठेवताना काळजी घ्या

कीटकनाशक, झुरळ अथवा उंदीर मारण्याची औषधे किंवा शीतपेयाची बाटली ही बहुतेक वेळा खाद्यपदार्थाच्या खोक्यात ठेवले जाते. त्यामुळे ही बाब घातक ठरू शकते. लहान मुले खाद्यपदार्थ म्हणून त्याचे सेवन करू शकतात. त्यामुळे अशी घातक रसायने अथवा वस्तु दक्षता घेऊन ठेवाव्यात. मुलांच्या हाताला येणार नाहीत, अशा पद्धतीने ही रसायने कुलूपबंद ठेवली पाहिजेत.

कीटकनाशक अत्यंत घातक : डॉ. शलाका पाटील

अरविंदने ‘ऑर्गेनोफॉस्फरस’ या प्रकारच्या कीटकनाशकाचे सेवन केले होते. हे कीटकनाशक अत्यंत घातक असते. त्याला रुग्णालयात आणले तेव्हा तो बेशुद्ध होता. सुरुवातीला त्याच्या पोटातील कीटकनाशकाची मात्रा काढली. त्यानंतर त्याच्या छातीतील पाणी नळीद्वारे काढले. त्यासाठी काही दिवस बालक व्हेंटिलेटरवर होते. बाळाने स्वत:हून श्वास घेणे सुरू केल्यानंतर व्हेंटिलेटर काढून टाकले. आता ताे सुखरूप आहे.

– डॉ. शलाका पाटील, बालराेग विभाग, ससून रुग्णालय

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28
Next Post

Aashadhi Vari News : श्रीक्षेत्र पैठणची श्रीसंत एकनाथ महाराज यांची पालखी हरी नामाचा गजर करत परंडा येथून पंढरीला मार्गस्थ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.