खराडी येथील इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के; विद्यालयाची यशाची परंपरा कायम
राजेंद्रकुमार शेळके
पुणे : जिल्हा शिक्षण मंडळ पुणे खराडी शाखेचा एस. एस. सी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातील 76 विद्यार्थ्यांपैकी 45 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले, तर 30 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 1 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आला.
विद्यालयातील गुण प्राप्त विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
अकोस्कर निलेश शिवाजी-92.40 टक्के गुण – प्रथम क्रमांक
जगताप श्रेयस विनोद -91.80 टक्के गुण- द्वितीय क्रमांक
गायकवाड तन्वी महेश-90.60 टक्के गुण-तृतीय क्रमांक
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, सहसचिव एल. एम. पवार, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, सहाय्यक सहसचिव ए. एम जाधव या पदाधिकाऱ्यांनी तसेच शाखेच्या मुख्याध्यापिका शिल्पा खांडरे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले .