Job Alert पुणे : भारतीय लष्करात नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, भारतीय लष्करात अग्निवीर होण्याची संधी तुम्हाला मिळू शकणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भारतीय लष्करात अग्निवीर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 25,000+ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही शारीरिक परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र), अग्निवीर दहावी पास (सर्व शस्त्र), अग्निवीर आठवी पास (सर्व शस्त्र) या पदांवर भरती केली जात आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र), अग्निवीर दहावी पास (सर्व शस्त्र), अग्निवीर आठवी पास (सर्व शस्त्र)
– रिक्त पदे : 25,000+ पदे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज शुल्क : रु. 250/- + GST.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १२ मार्च २०२५.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२५.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://joinindianarmy.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.