पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बुलडाणा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सहाय्यक विशेष कार्य अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक कार्यालय, डेटा एंट्री ऑपरेटर आणि मदतनीस या पदासाठी भरती केली जाणार आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, 20 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक विशेष कार्य अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक कार्यालय, डेटा एंट्री ऑपरेटर आणि मदतनीस.
– एकूण रिक्त पदे : 13 पदे.
– नोकरीचे ठिकाण : बुलडाणा
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : समन्वय अधिकारी भूसंपादन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://buldhana.nic.in/ वरून माहिती घेता येणार आहे.