Pune News : पुणे : आजच्या घडीला मुलाचं शिक्षण झालं आहे. पण त्यांना नौकरी मिळवणं थोडं अवघड आहे. त्यांमुळे मोठ्या प्रमाणात मुले बेरोजगार झाली आहेत. बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात. यासाठी शिरुर-हवेली भारतीय जनता पार्टीतर्फे बेरोजगार तरुणांसाठी ऑनलाईन नोकरी महोत्सव ही नविन संकल्पना राबवली जात आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे. Pune News
बेरोजगार तरुणांसाठी ऑनलाईन नोकरी महोत्सव
पुण्याच्या सर्व बाजूंनी औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चाकण, रांजणगाव-कारेगाव, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी, हिंजवडी व खराडी आय.टी. हब त्याचप्रमाणे पिंरगुट, कोंढापुरी, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढु, फुलगाव, लोणीकंद येथे इंडस्ट्रीत झोन निर्माण झाले असून त्यामध्ये शेकडो कंपन्या कार्यरत आहेत.
या कंपन्यामध्ये स्कील/ अनस्कील अशा हजारो कामगारांची कमतरता भासत आहे. सदर कमतरता भरुन काढण्यासाठी व महाराष्ट्रातील शेकडो बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी शिरुर- हवेली भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ”ड्रीम जॉब” नावाची वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. Pune News
दरम्यान, ”ड्रीम जॉब” Dreamsjob.net.in या वेबसाईटवर जाऊन बेरोजगार युवकांनी आपली नाव नोंदणी करायची आहे. सदर वेबसाईट चा अॅक्सेस हा कंपन्यांना देण्यात येणार असुन कंपन्यांना ज्या कामगारांची आवश्यकता आहे. त्या कामगारांना कंपनी मेसेज करुन मुलाखती करीता बोलावून घेतील अथवा ऑनलाईन मुलाखती घेतील.
याबाबत बोलताना संदीप भोंडवे म्हणाले की, ‘ड्रीम जॉब” या वेबसाईटवर तरुणांना ही सेवा विनामूल्य मिळणार आहे. फक्त अर्जदाराने मोबाईलवर सरल अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहणार आहे. Pune News