पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेत विविध पदांवर भरती केली जात आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून, या अंतर्गत ७६ रिक्ते पदे भरली जाणार आहेत.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेत तांत्रिक सहाय्यक या पदासह प्रयोगशाळा परिचर या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण ७६ रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2023 असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– विभागाचे नाव : इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)
– पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर – १
– एकूण पद संख्या : ७६
– शैक्षणिक पात्रता काय असावी?
तांत्रिक सहाय्यक – संबंधित विषयात पदवी
प्रयोगशाळा परिचर – ITI आणि १० वी पास.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ८ नोव्हेंबर २०२३
– अधिकृत वेबसाईट : या भरती प्रक्रियेंतर्गत अधिक माहितीसाठी https://nirt.res.in/ या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेता येऊ शकणार आहे.