पुणे : नोकरी मिळवण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात विविध परीक्षा, मुलाखती दिल्या जातात. पण तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, आता अकोला येथील अंगणवाडी येथे नोकरीची संधी मिळू शकते. त्यानुसार, अर्ज मागवण्यात येत आहेत.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. अकोला येथील अंगणवाडी येथे अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या 26 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2025 असणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://akola.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस.
– एकूण रिक्त पदे : 26 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अकोला.
– शैक्षणिक पात्रता : 12 वि पास.
– वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष).
– वेतन / मानधन : दरमहा 7500 रुपये
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मार्च 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (सिव्हिल), अकोला शहर, आयटीआय कॉलेजजवळ, महसुल कॉलनी, अकोला – पिन-444001.