पुणे : नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 3 मे, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ येथे सेवानिवृत्त अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी rupali.gaikwad@mahait.org येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सेवानिवृत्त अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वयोमर्यादा : 58-65 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 मे 2025.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : rupali.gaikwad@mahait.org
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahait.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.