पुणे : आर्मी स्कूलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात विविध परीक्षा, मुलाखती दिल्या जातात. पण तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही आर्मी स्कूलमध्ये नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, एका आर्मी स्कूलमध्ये आता नोकरी मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. नागपुरातील आर्मी पब्लिक स्कूल येथे मुख्य शिक्षिका, पीजीटी, टीजीटी, पीआरटी, शारीरिक शिक्षण, कला आणि हस्तकला, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, समुपदेशक, विशेष शिक्षक, आयटी पर्यवेक्षक प्रभारी, प्री-पीआरटी, लॅब अटेंडंट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या 23 रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी स्कूल ऑफिस, आर्मी पब्लिक स्कूल कामठी, द मॉल रोड, कामठी कँट, नागपूर-जबलपूर रोड, पिन- 441001 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.apskamptee.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.