पुणे : चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात विविध परीक्षा, मुलाखती दिल्या जातात. पण तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही चांगल्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील एअर फोर्स स्कूल येथे आता नोकरी मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. पुण्यातील एअर फोर्स स्कूल येथे अकाउंट असिस्टंट, मदतनीस (पुरुष) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. 21-50 वर्षे असलेली व्यक्ती यासाठी अर्ज करू शकणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.airforceschoolpune.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.