Job News नवी दिल्ली : भारतीय लष्कर ही देशातील सर्वाधिक नोकऱ्या देणार्या सरकारी संस्थांपैकी एक आहे. भारतीय लष्करात कॉन्स्टेबलपासून ते लेफ्टनंटपर्यंतच्या पदांसाठी थेट भरती केली जाते. सैन्यात अधिकाऱ्यांच्या भरतीचे दोन प्रकार आहेत. एक शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि पर्मनंट कमिशन. शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील सेवा 10 वर्षे असते. जे जास्तीत जास्त 14 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. तर पर्मनंट कमिशनमध्ये सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत असते. (Job News)
लष्करात भरतीसाठी दहावी पास ते पदवीधरपर्यंत पात्रता असावी लागते. त्यात इंजिनिअरिंग अर्थात अभियांत्रिकी पदवीधर तरुणांना चारप्रकारे भरती प्रक्रियेत सामील होता येते. एंट्री स्कीममध्ये निवड झाल्यानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथे 49 आठवड्यांचे प्रशिक्षण आणि इंडियन मिलिटरी अकादमीसाठी निवड झालेल्यांसाठी 18 आठवड्यांचे प्रशिक्षण असते. (Job News)
तांत्रिक पदवी अभ्यासक्रम (TGC)
नोकरीचे स्वरूप – पर्मनंट कमिशन
पगार – 56,100 ते 1,77,500
वयोमर्यादा – 20 ते 27 वर्षे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, SSB मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षा
सीडीएस प्रवेश
नोकरीचे स्वरूप – शॉर्ट सर्व्हिस कमिशन
पगार – 56,100 – 1,77,500
वयोमर्यादा – 19 ते 24 वर्षे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक.
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, SSB मुलाखत आणि नंतर वैद्यकीय परीक्षा.
याबाबतच्या अधिक तपशीलांसाठी भारतीय लष्काराची भरती वेबसाईट joinindianarmy.gov.in ला भेट द्यावी. तसेच nic.in वरूनही माहिती घेता येऊ शकते. (Job News)