Job News मुंबई : बँकेत नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. काहींची इच्छा पूर्ण होते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्केल 2 आणि स्केल 3 च्या अधिकारी पदांवर ही भरती करण्यात येत आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने अधिसूचना जारी केली आहे. (Job News)
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीस इच्छुक उमेदवार 13 जुलै म्हणजे आजपासून अर्ज करू शकणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट Bankofmaharashtra.in वर जाऊन भेट देण्याची गरज आहे.
किती पदे भरली जाणार?
एकूण 400 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी 100 रिक्त पदे अधिकारी श्रेणी III साठी आहेत आणि 300 रिक्त पदे अधिकारी श्रेणी II साठी आहेत.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतील सर्व सेमिस्टरच्या एकूण किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. JAIIB आणि CAIIB उत्तीर्ण आवश्यक. CA/CMA/CFA सारखी व्यावसायिक पात्रता देखील असणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा काय?
अर्ज करण्यास सुरुवात – 13 जुलै, 2023
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 25 जुलै, 2023
वयोमर्यादा काय?
31 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय स्केल II साठी किमान 25 वर्षे आणि कमाल 35 वर्षे आणि स्केल III साठी 25 ते 38 वर्षे असे निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज शुल्क किती?
बँक ऑफ महाराष्ट्र मधील UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क रुपये 118 आहे.
इथं करा अर्ज…
अधिकृत वेबसाईट Bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.