पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण आता मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे सी, कनिष्ठ अभियंता-बी, लिपिक-अ आणि प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक-बी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 6 रिक्त पद भरली जाणार असून, संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1,10,097 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी 24 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. उमेदवारांनी आपला अर्ज प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005 या पत्त्यावर पाठवावा.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सी, कनिष्ठ अभियंता-बी, लिपिक-अ आणि प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक-बी
– एकूण रिक्त पदे : 6 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, एनटीसी/एनएसी, एनसीव्हीटी, यांत्रिक अभियांत्रिकी डिप्लोमा, बी.ई./बी. टेक इन कॉम्प्युटर सायन्स.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 39,500/- ते रु.1,10,097/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता (हार्ड कॉपी) : प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.tifr.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.