पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे. कारण, मुंबईतील मध्य रेल्वेच्या शाळेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.
मध्य रेल्वे शाळा, कल्याण, मुंबई येथे PGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कल्याण येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 16 रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.crskyn.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : PGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक.
– एकूण रिक्त पदे : 16 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कल्याण.
– शैक्षणिक पात्रता : बारावी, बी.ए., बी.एस्सी., एम.एस्सी. एम.ए. बी.कॉम., एम.कॉम.
– वेतन / मानधन : दरमहा 21250 ते 27500 पर्यंत.
– वयोमर्यादा : 18-65 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 12, 13 आणि 17 मार्च 2025.
– मुलाखतीचा पत्ता : चेंबर ऑफ प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे सेक (ईएम) स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कल्याण.