पुणे : नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 21 एप्रिल, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे वरिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला परभणी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी संशोधन अभियंता, AICRP वर MAH, VNMKV, परभणी- 431402 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन फेलो.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : परभणी.
– वेतन / मानधन : दरमहा 37000 ते 42000 रुपयांपर्यंत.
– वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : संशोधन अभियंता, AICRP वर MAH, VNMKV, परभणी- 431402 (MH)
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.vnmkv.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.