जर तुम्हाला जास्त वर्षे जगायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त 30 मिनिटे स्वत:साठी काढावी लागतील. अधिक शारीरिक हालचाली केल्याने तुमचं वय 9 वर्षे वाढू शकते. त्यात जॉगिंग हा दीर्घायुष्यासाठी उत्कृष्ट व्यायाम असल्याचेही सांगण्यात आले आहे. जर तुम्ही 40 वर्षांचे असाल तर तुम्हाला अधिक व्यायाम करणे गरजेचे आहे.
तुम्ही शारीरिक हालचाली जास्त प्रमाणात करत असाल तर तुमच्यासाठी हे वरदानच ठरू शकतं. एखादी व्यक्ती जितकी जास्त शारीरिकदृष्ट्या सक्रिय असेल तितके कमी जैविक वृद्धत्व येते. व्यायामामुळे टेलोमेरची लेंथ वाढते. हे आपल्या जैविक घड्याळासारखे आहेत. जसजसे वय वाढते तसतसे टेलोमेर लहान होतात. जेव्हा पेशी विभाजित होतात, तेव्हा टेलोमेरची लेंथ थोड्या प्रमाणात कमी होते. शारीरिकदृष्ट्या सक्रिय लोकांमध्ये लेंथ टेलोमेर असतात, तर आळशी लोकांमध्ये लहान टेलोमेर असतात ज्यामुळे जैविक वृद्धत्व वाढते.
शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह राहण्यासाठी, महिलांनी दिवसातून 30 मिनिटे, आठवड्यातून पाच दिवस जॉगिंग करावे. तर पुरुषांनी 40 मिनिटे जॉगिंग करावे. याशिवाय दर आठवड्याला किमान 30 ते 40 मिनिटे धावणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीरातील जैविक वृद्धत्व टाळता येईल. तसेच धावणे आणि चालण्याने तुम्ही अनेक समस्यांपासून दूर राहू शकता.