आपण निरोगी असावं असं सर्वांनाच वाटत असतं. पण, काही समस्या या अनेकदा उद्भवतात. त्यात काही लोकांना काही खाल्ल्याबरोबर शौचास होते. हे अपचन किंवा जास्त खाण्यामुळे असू शकते. म्हणून काहीजण याकडे दुर्लक्ष करतात. पण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
सकाळी उठल्यानंतर आतड्याची हालचाल होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यानंतर शौचास जाणे हे विशेष नाही. परंतु प्रत्येकवेळी अन्न खाल्ल्यानंतर शौचालयात जावे लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अन्न खाल्ल्यानंतर लगेच शौचास जावे लागत असेल तर लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. काही अन्न खाल्ल्यानंतर लगेच शौचास जाण्याच्या समस्येला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लक्स म्हणतात. खाल्ल्यानंतर शौचास जाण्याची इच्छा बऱ्याचदा चिडचिड्या लोकांमध्ये दिसून येते.
या समस्येपासून दूर राहण्यासाठी मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळावे. तुम्ही जे काही खाता ते नीट खा. तुमच्या आहारात अधिक फायबरचा समावेश करा, दररोज 30 मिनिटे व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, तणावाचे व्यवस्थापन करा, कॅफिनचे कमीत कमी सेवन करा. भरपूर पाणी प्या. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.