आपल्या निसर्गात अशा अनेक वनस्पती आहेत त्याचा फायदाही मोठा आहे. पण अनेकांना अशा वनस्पतींविषयी माहिती नसेल. त्यापैकी पुदीना ही एक वनस्पती आहे. पुदीन्याचा वापर साधारणपणे चटणी बनवण्यासाठी केला जातो. मात्र, त्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदेही आहेत. पुदीन्यामुळे पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
पुदीना चटणी देखील शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. पुदीन्यामध्ये डाळिंब, हिरव्या कच्चे टोमॅटो, लिंबू, आले, हिरवी मिरची, ओवा, काळे मीठ, मिरपूड घालून चटणी बनवली जाते. या चटणीचे सेवन केल्याने पोटासंबंधित आजारांमध्ये फायदा होतो. पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीना सर्वोत्तम मानला जातो. सध्याच्या धावपळीच्या युगात पोटासंबंधी अनेक समस्या उद्भवतात. यासाठी एक चमचा पुदीना रसामध्ये, एक कप कोमट पाणी आणि एक चमचा मध मिसळा. याच्या सेवनाने पोटातील आजारांपासून आराम मिळू शकतो.
पुदीनाच्या पानांची पेस्ट जखमेवर गुणकारी मानली जाते. पुदीन्याची पेस्ट हलके गरम करून ती कोणत्याही प्रकारच्या जखमेवर किंवा कीटकांच्या चाव्यावर लावली जाते. यामुळे जखम आणि कीटकांच्या चाव्यापासून आराम मिळतो. यासह, यामुळे होणारी वेदना आणि सूज देखील कमी होते. Peppermint can provide relief from stomach problems