पुणे : दैनंदिन जीवनात दररोज भाज्यांचे सेवन केल्याने अनेक आजार बरे होतात. मात्र आता भाज्याच नव्हे तर भोपळा या बहुगुणी फळांच्या बियाही आरोग्यासाठी वरदान ठरत आहेत.भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्वं आढळतात, जी शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. या बियांमध्ये प्रोटीन, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, झिंक, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यांचं नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट, झिंक, मॅग्नेशियम, लोह यांसारखी खनिजं आणि व्हिटॅमिन ई आणि बी सारखी व्हिटॅमिन्स असतात, जी आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतात. या बियांमुळे होणारे फायदे जाणून घेऊया..
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : या बियांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई, झिंक आणि हेल्दी फॅट्स तुमच्या त्वचेला चमकदार बनवतात आणि केस मजबूत करतात. नियमित सेवनाने केस गळण्याची समस्याही कमी होते.
मधुमेहात फायदेशीर : ज्या लोकांची ब्लड शुगर जास्त असते, त्यांनी रोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाव्यात. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळू हळू वाढते. या बियांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे शुगर नियंत्रणात राहते. याच्या सेवनाने स्वादुपिंड नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार करतं.
वजन नियंत्रणात राहतं : फायबरयुक्त भोपळ्याच्या बियांचं सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. या बियांमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं, शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन कमी होतं. या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन असतं, जे मानसिक स्थिती सुधारतं, ज्यामुळे ऊर्जेची पातळी वाढते.
पचनक्रिया मजबूत करते : भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत काम करण्यास मदत करते. नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोट स्वच्छ राहतं.