Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : ‘‘जगदगुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी न आल्यास वारकऱ्यांना कोणतेही सहकार्य न करता गाव बंद केले जाणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. (Loni Kalbhor News)
लोणी ग्रामस्थ पालखी गावात आलीच पाहिजे या निर्णयावर ठाम
लोणी काळभोर, (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत लोणी काळभोर ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन रविवारी (ता. ०४) करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. ‘‘जगदगुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज’’ पालखी सोहळ्याच्या प्रमुखांवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ५० ते ६० वर्षाची परंपरा मोडीत काढून पालखी गावात न आणण्याचे सांगत असले तरी लोणी ग्रामस्थ पालखी गावात आलीच पाहिजे या निर्णयावर ठाम आहेत. (Loni Kalbhor News)
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. या सर्व पालख्यांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. परंपरेनुसार वारकरी पंढरपूरला जातात. स्थानिक नागरिकांच्या बरोबरच राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागिय आयुक्त आदी सर्व सरकारी यंत्रणा, काही स्वयंसेवी संस्था, स्थानिक तरुण मंडळे पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा म्हणून जीवाचे रान करतात. वारक-यांना अन्न, पाणी, निवारा उपलब्ध व्हावा म्हणून सर्वजण झटत असतात. मात्र लोणी काळभोर गावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामी आणण्या बाबतीत पालखी सोहळा प्रमुखांनी अजुन निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (Loni Kalbhor News)
यावेळी सरपंच योगेश काळभोर, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर, माऊली काळभोर, विठ्ठल काळभोर, संतोष भोसले, रेहमान इनामदार, रशीद इनामदार, फैयाज इनामदार, इरफान शेख, रियाज शेख आदी ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा व्यवस्थित सुरळीत आहे. त्या ठिकाणी कोणताही वाद नाही, विसंवाद नाही. काही मर्यादा नाहीत मग लोणी काळभोर व उरुळी कांचन या ठिकाणी दाखल होणाऱ्या संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीला का अडचण येते याचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही. मात्र लोणी काळभोर व उरुळी कांचन गावातील नागरिकांमध्ये पालखी सोहळ्याच्या विसावा व मुक्कामा बाबतीत निर्णय घेणा-या संबंधितां बद्दल प्रचंड नाराजी वाढली आहे. या संदर्भात ठोस व ठाम निर्णय अजूनही विश्वस्तांनी घेतला नसल्याने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (Loni Kalbhor News)
दरम्यान, पालखी मंदिरात ठेवून दिंड्या पालखी मैदानावर विसाव्या साठी थांबविल्या पाहिजे. रितीरिवाजाप्रमाणे पालखी विठ्ठल मंदिरातच असावी. याबाबत ग्रामस्थ काही झाले तरी पालखी गावातच आली पाहिजे यासाठी आक्रमक पवित्रा घेणार असून तसा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी विविध ग्रामस्थांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. (Loni Kalbhor News)
याबाबत बोलताना सरपंच योगेश काळभोर म्हणाले की, ५० ते ६० वर्षापासून असलेली परंपरा पालखीचे विश्वस्त मोडुन काढत आहेत. पालखी मुक्कामासाठी सर्व संबंधितांना पत्रक देऊन पालखी मुक्काम लोणी गावातच झाला पाहिजे अशी विनंती करण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Collector Visited Palkhimarg : वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये : जिल्हाधिकारी