Health Tips : सध्या हवामानात बदल होत आहे. पावसाळा तर सुरू झाला आहेच पण तो नंतर ओसरायला लागून हिवाळ्याची चाहूल लागेल. एक ऋतू बदलून दुसरा ऋतू सुरू होण्याच्या या काळात काही संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुलांमध्ये अशा आजारांचा प्रसार वेगाने होत असतो. त्यापासून मुलांचा बचाव करण्यासाठी काही उपायांची गरज असते. या काळामध्ये व्हायरल फिव्हर म्हणजे ताप, थंडी आणि खोकला असा आजार होऊ शकतो. त्यावर उपाय करण्याची गरज आहे.
हे उपाय ठरतील फ़ायदेशीर
नियमित वाफ घ्या…
लहान मुलांना सर्दी झाली आणि त्यांचे नाक चोंदले की श्वास घ्यायला त्रास सुरू होतो. त्यावर सोपा उपाय म्हणजे गरम पाण्याच्या वाफा श्वासातून आत घेणे. (Health Tips) साधारण दहा ते पंधरा मिनिटे अशा वाफा घ्याव्यात आणि शक्य असल्यास वाफेसाठी वापरावयाच्या पाण्यात कॅलिप्टस ऑईल टाकावे.
मधाचा करा वापर
दुसरा उपाय म्हणजे मधाचा वापर आपले बाळ अगदीच लहान असेल तर त्याला दिवसभरातून चार-पाच वेळा मधाचे बोट चाटवणे हा चांगला उपाय आहे. (Health Tips) पण जर मूल पाच वर्षापेक्षा मोठे असेल तर त्याला एक चमचा मध त्यामध्ये थोडी दालचिनीची पावडर टाकून तो मध प्यायला द्यावा. त्यामुळे सर्दी कमी होते आणि खोकला कमी होतो. हा उपाय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फायद्याचा ठरू शकतो.
आळीव बी आणि तुळशीची पाने गुणकारी
आळीवाचे बी आणि तुळशीची पाने टाकलेले पाणी उकळावे आणि ते पाणी मुलाला प्यायला द्यावे. त्यामुळे कफाने दाटलेली छाती मोकळी होते आणि सर्दी कमी होते.
तेलाने मालीश फायद्याची
लहान मुलांना विशेषतः दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोहरीच्या तेलाने मसाज करावा. तो करताना त्यात थोडासा लसूण टाकावा. मसाज करताना छाती, मान, पाठ यांच्या मालीशकडे लक्ष द्यावे. (Health Tips) तळहात आणि तळपाय यांना चांगला मसाज द्यावा.
भरपूर पाणी प्यावे
मुलांना भरपूर पाणी पिण्यास देणे. हे खोकल्यामध्ये आवश्यक असते. पाणी जर शुद्ध असेल आणि फिल्टर्ड असेल तर त्या पाण्यामुळे घशात खवखव निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचे शरीरातले प्रमाण कमी होते आणि संसर्ग कमी होतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल रोखेल दालचिनी
Health Tips : साठीनंतर आरोग्याकडे द्या लक्ष, करु नका दुर्लक्ष
Health Tips : ब्लडप्रेशर नियंत्रणासाठी फायदेशीर आहे डार्क चॉकलेट