Health Tips : आहारात फळांचा समावेश असावा असे सांगितले जाते. त्यानंतर पालेभाज्या देखील असाव्यात. कारण पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पालक, मेथी, चवळी, चुका, शेपू इत्यादी भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. याच पालेभाज्यांमध्ये कॅलरीज् आढळतात. त्यामुळे कोणत्याही रोगात, आजारात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो.
मधुमेहाच्या रुग्णांना हिरव्या पालेभाज्या वरदान
हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले ल्युटिन डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत करतात. मोतीबिंदू वयोमानानुसार, डोळ्यांत होणारे बदल यामध्ये हिरव्या पालेभाज्या अत्यंत उपयुक्त आहेत. व्हिटॅमिन ‘A’च्या कमतरतेमुळे होणाऱ्या रातांधळेपणापासून बचाव होतो.(Health Tips ) तसेच मधुमेहाच्या रुग्णांना हिरव्या पालेभाज्या एक वरदानच आहे. भरपूर जीवनसत्त्वांचा स्त्रोत आहे. त्याशिवाय तंतूमय पदार्थही भरपूर प्रमाणात मिळतात. तंतूमय पदार्थ भरपूर मिळाल्याने जेवणानंतर वाढणारी रक्तातील साखर बऱ्यापैकी नियंत्रणात राहते.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरी आढळतात. यामध्ये कार्बोहायड्रेट देखील कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. (Health Tips ) त्यातील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडेंट्समुळे आपल्या हृदय आणि डोळ्यांनादेखील फायदा होतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची कशी? जाणून घ्या ; घरगुती उपाय
Health Tips : अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास करावं तरी काय? घाबरु नका पण हे जरूर करा
Health Tips : तुम्हाला माहितीये का डाळिंबाचे ; फायदे; पचनक्रियेसोबतच स्मरणशक्तीही सुधारते