Government and semi-government employees strike | सोलापूर : महाराष्ट्रात कालपासून १८ लाख सरकारी आणि निमसरकारी (semi-government) कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने पारिचारिका आणि इतर वैद्यकीय स्टाफही संपावर गेला आहे. या संपातही सोलापुरात माणुसकीचं दर्शन घडले आहे.
एक गर्भवती महिला उपचारासाठी रुग्णालयात आली होती. त्यावेळी परिचारिका आंदोलन करत होत्या. मात्र ही गर्भवती महिला येताच या परिचारिकांनी आंदोलन सोडून तिला हात दिला आहे. आंदोलनातही परिचारिकांनी माणुसकी दाखवल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
सोलापूर शासकीय रुग्णालयातील जवळपास १२०० कर्मचारी कालपासून संपात सहभागी…
सोलापूर शासकीय रुग्णालयातील जवळपास १२०० कर्मचारी कालपासून संपात सहभागी आहेत. व्हीलचेअर, स्ट्रेचर ढकलण्यापासून सर्व काम रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागत आहेत. दुसऱ्या दिवशी शासकीय रुग्णलयात एकत्रित येऊन बी ब्लॉकसमोर शासन विरोधात घोषणाबाजी करत होते.तितक्याच एक गर्भवती महिला उपचारासाठी रिक्षातून रुग्णालयाजवळ आली.
गर्भवती महिलेला खूप वेदना होत होत्या. तेव्हा परिचारिकांनी या गर्भवती महिलेला रिक्षातून उतरवले. तिला रुग्णालयात घेऊन गेल्या. या महिलेला अॅडमिट करून तिच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर या परिचारिका पुन्हा आंदोलनात आल्या आणि त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. या महिला आंदोलकांची ही माणुसकी पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला.
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील ३५० स्टाफ नर्स, ११० मामा-मावशी, ११० क्लार्क आणि शिपाई संपात सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील कामकाजावर बंदी घातली आहे. त्यामुळे रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. रुग्णांचे जे काही बरे वाईट होईल त्याला प्रशासन आणि शासन जबाबदार असेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, कोविड काळात केवळ परिचारिका सेवा देत होत्या, त्यावेळी आम्हाला वाढीव भत्ता देण्याचे आश्वासन दिले, मात्र भत्ता दिला नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत कामावर हजर होणार नाही. असे संपकऱ्यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Big Crime News : बायको व मुलाचा खून करून आयटी अभियंत्याने केली आत्महत्या ; औंध परिसरातील घटना