उन्हाळ्यात चहा पिणे अनेकांच्या सवयीचा भाग असतो. पण या ऋतूमध्ये गरम पेये शरीरावर काही प्रतिकूल परिणाम करू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात चहा पिणे टाळावे.
उन्हाळ्यात चहा पिण्याचे होतात ‘हे’ विपरीत परिणाम
1. डिहायड्रेशन: चहा (विशेषतः ज्यामध्ये कॅफिन असते) हे मूत्रवर्धक असते, म्हणजेच ते शरीरातून पाणी बाहेर टाकण्याचे काम करते. त्यामुळे गरमीच्या दिवसांत शरीराला जास्त पाणी लागते. मात्र चहामुळे डिहायड्रेशनची शक्यता वाढवतो.
2. शरीराचे तापमान वाढवते: गरम चहा पिल्याने शरीराचे अंतर्गत तापमान वाढू शकते, जे उन्हाळ्यात शरीराच्या थंडाव्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला अडथळा ठरू शकते.
3. ऍसिडिटी आणि अपचन: रिकाम्या पोटी किंवा अधिक चहा पिल्यास ऍसिडिटी, गॅस, अपचन यांसारख्या समस्या जाणवू शकतात.
4. झोपेवर परिणाम: कॅफिनयुक्त चहा अधिक प्रमाणात घेतल्यास झोपेवर परिणाम होतो. उन्हाळ्यात झोप कमी झाल्यास थकवा, चिडचिड, व मन:स्वास्थ्यावर परिणाम होतो.
5. त्वचेवर परिणाम: डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी होऊ शकते, डाग, रॅशेस येऊ शकतात, आणि त्वचेचा निखार कमी होऊ शकतो.
6. हृदयावर विपरीत परिणाम: जास्त कॅफिनचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडू शकते.
यावर उपाय म्हणून ‘हे’ पेय घ्या
उन्हाळ्यात गरम चहा कमी करून ग्रीन टी, हर्बल टी, किंवा लेमनग्रास टीसारख्या हलक्या पेयांचा वापर करा. दिवसभर पुरेसे पाणी प्या. गरम चहा ऐवजी थंड नैसर्गिक पेय (उदा. लिंबूपाणी, ताक, पुदिन्याचं पाणी) घ्या.
(टीप: सदरची माहिती ही वाचकांसाठी पुरवण्यात येत आहे. यातुन पुणे प्राईम न्यूज कोणताही दावा करत नाही)