सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रश्न, आव्हानं पेलावी लागतात. त्यावेळी खूप मेहनत झाल्याने अनेकांना आपल्या आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष द्यायला जमत नाही. त्यामुळे आरोग्याच्या काही समस्याही उद्भवू शकतात. त्यात अस्वस्थ वाटणे ही समस्या आपल्यापैकी काही जणांना भेडसावत असेल तर काही काळजी घेणे गरजेचे असते.
अस्वस्थ वाटत असल्यास, प्रथम शांत होण्याचा प्रयत्न करा. खोल श्वास घ्या, ध्यान करा, किंवा संगीत ऐका. त्यानंतर, योग्य उपाय निवडण्यासाठी तुमच्या अस्वस्थतेचे कारण जाणून घ्या. ध्यान आणि योग फायद्याचा ठरू शकतो. रोज थोडा वेळ ध्यान किंवा योग केल्याने ताण कमी होतो. श्वासोच्छ्वास घ्यावा. खोल श्वास घेणे शांत राहण्यास मदत करते. त्यामुळे अस्वस्थपणाची समस्या जर जाणवली तर दीर्घ श्वास घेऊन तो हळूहळू सोडा. हे काही मिनिटे करून पाहा. समस्येतून मार्ग निघू शकतो. याशिवाय, तुमच्या आवडत्या छंदात व्यस्त राहणे तणाव कमी करते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घेणे अधिक गरजेचे आहे. साधारणपणे, रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे. एकटे राहण्याचे टाळा. इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. संवाद साधल्याने चिंता कमी होऊ शकते. नियमित व्यायाम केल्यानेही चिंता, काळजी कमी होते. त्यामुळे हेदेखील आपण करू शकता. अल्कोहोल आणि कॅफीन टाळा. या सर्व गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.