हनुमंत चिकणे..
Climate News : उरुळी कांचन, ता. २७ : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात सर्दी, व तापाच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील ग्रामीण व खासगी रुग्णालयांमधील रुग्णांची गर्दी वाढली आहे. ताप, सर्दी, खोकला आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.(Climate News)
सर्दी, व तापाच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.
पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे जूनमध्ये तापाच्या रुग्णांचे प्रमाण कमी होते. जुलै महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले, तसे तापाच्या रुग्णाचेही प्रमाण वाढले आहे. विषाणूंच्या वाढीसाठी सध्याचे वातावरण पोषक आहे. त्यामुळे व्हायरल ताप, सर्दी, खोकला यांचेही रुग्ण वाढत आहेत. अनेकदा साधा ताप समजून घरगुती उपचार केले जातात. त्यामुळे ताप बरा होत नाही. शहरात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसादुखी थंडी ताप अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहे.(Climate News)
लहानांपासून तर वृद्धांपर्यंत संसर्गजन्य आजाराने डोके वर काढल्याचे चित्र आहे. अन्य गंभीर आजारांपेक्षाही सर्दी, खोकल्याचा त्रास वाढताना दिसत आहे. ताप नेमका कोणत्या प्रकारचा आहे, हे समजून त्यानुसार उपचार करण्यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. शहरात डेंगी व चिकनगुनियाचेही रुग्ण आढळत असले तरी ते प्रमाण कमी आहे.(Climate News)
दरम्यान, वातावरणातील हे बदल जनजीवन विस्कळीत करणारे, ठप्प करणारे ठरत आहे. सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत सर्वदूर धुके पसरत आहेत. त्यामुळे दैनंदिन व्यवहार कमालीचे मंदावले आहेत.(Climate News)
घरगुती उपाय पडू शकतात महागात…
कोविडच्या भितीमुळे अनेकांनी घरीच राहून उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातही डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे टाळले जात आहे. घरगुती उपाय आजारामध्ये महागात पडू शकते. त्यामुळे घरगृती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेवून उपाचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.(Climate News)
पावसाळ्यात ही काळजी घ्या….
*अतिथंड पाणी अथवा शीतपेय पिण्याचा मोह टाळा. शक्यतो हलका व पौष्टिक आहार घ्या.
*उघड्यावरचे तेलकट व खाद्यपदार्थ खाणे टाळा. आहारात पालेभाज्या वफळांचा समावेश करा.
*या दिवसात बऱ्याचदा नळाला गढूळ पाणी येते, त्यामुळे पाणी गाळून व उकळून प्या.
*पावसात डासांचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे घर व परिसरात पाण्याची डबकी साचणार नाहीत, याची काळजी घ्या.
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटलचे डॉ. समीर ननवरे म्हणाले, ” वातावरणात उकळून गार केलेले पाणी पिणे, बाहेरचे खाणे टाळावे, या वातावरणात स्वतःचे संरक्षण करावे. त्यातच उरुळी कांचनसह परिसरात डोळे येण्याच्या प्रमाणात वाढ झालेली पहायला मिळत आहे. दोन – तीन वेळेस स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे, तसेच इतरांना इन्फेक्शन होणार यासाठी डोळ्यांना चेष्मा लावावा. तसेच वातावरणात बदल झाल्याने नागरिकांनी कोमट पाणी प्यावे, पुरेशी विश्रांती घेऊन पाणी मोठ्या प्रमाणात प्यावे.(Climate News)
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. गणेश ताठे म्हणाले “सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सध्या जास्त आहेत. त्याच्यासोबत डोकेदुखी आणि थंडी वाजणेहि आहे. सध्या उरुळी कांचनसह परिसरात डेंगूसदृश आजारांनी डोके वर काढले आहे. मात्र डेंगू आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरगुती उपाय न करता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा, तसेच पाणी उकळून प्यावे, रुग्णांनी वेळेवर उपचार घेतला तर तत्काळ आराम मिळतो.(Climate News)
उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुचिता कदम म्हणाल्या, “उरुळी कांचनसह परिसरात बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. यामध्ये ताप, सर्दी, खोकला तसेच सांधेदुखीचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी घरगुती उपचार न करता प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी.(Climate News)